त्रिंगलवाडी (Tringalwadi)

त्रिंगलवाडी(Tringalwadi) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. त्रिंगलवाडी किल्ल्याच्या डोंगरावर दहाव्या शतकातील जैन लेणी आहेत. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माल थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठेत येते असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

उंची : ३२३८ फूट ⛰

इतिहास 🚩

● त्रिंगलवाडी(Tringalwadi) किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती १० व्या शतकात झाली असावी असे कळते.
● हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही.
● मात्र १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला.
● पुढे १८१८ मध्ये बाकी किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

स्थळदर्शन 😍

◆ त्रिंगलवाडी(Tringalwadi) गावातून गडावर जाताना पायथ्याशी पांडवलेणी नावाची लेणी (गुहा) आहे.
◆ इथे ८ गुहा असून त्यापैकी ६ गुहा पायथ्याशी आहेत. तर २ गुहा डोंगरावर आहेत.
◆ या किल्ल्यावर शंकराचे मंदिरही आहे.
◆ या मंदिरा समोरच्या कड्यावरून पूर्वेला कळसुबाई, उत्तरेला त्र्यंबकरांग, हरिहर, बसगड असा परिसर दिसतो.

विशेष 🤩

★ त्रिंगलवाडी(Tringalwadi)) हा किल्ला गुहांसाठी प्रसिद्ध आहे.

जवळचे किल्ले 😍

  • बलवंतगड
  • कावनई

कसे जाल ? 🕺🏼

त्रिंगलवाडी(Tringalwadi) हे गाव इगतपुरीपासून ७ km किमी अंतरावर आहे. इगतपुरी हे मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर तसेच राष्ट्रीय महामार्ग एन.एच. १६० वर आहे. इगतपुरी येथून त्रिंगलवाडी गावात जाण्यासाठी दोन मार्ग आहेत प्रथम एक इगतपुरी गावातून जातो आणि दुसर्‍या मार्गाने घोटी येथे एन.एच. १६० कडे उत्तरेकडे जाऊ शकतो. बलायादुरी गावातून त्रिंगलवाडी किल्ला उत्तर-दक्षिण दिशेने जाणार्‍या डोंगरावर आहे.

  • राहाण्याची सोय : किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत…: करावी.
  • पाण्याची सोय : गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.

Google Map 🌎

लोकेशन पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published.

Start typing and press Enter to search