सरसगड (sarasgad)

सरसगड(sarasgad) हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पाली या गावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायकांत गणना होत असलेल्या बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे.

उंची : १६०० फूट ⛰

इतिहास 🚩

● इ.स. १३४६ मध्ये मलिक अहमदने ( निजामशाहीचा संस्थापक) सरसगड (sarasgad) किल्ला जिंकून घेतला.
● नंतर हा किल्ला आदिलशाहीत गेला.
● आणि पुढे शिवाजी महाराजांनी जिंकून स्वराज्यात आणला.
● शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली.

● यानंतर याकिल्ल्याची जबाबदारी भोर संस्थानकडे आली आणि १९४८ पर्यंत ती त्यांच्याकडेच होती.

स्थळदर्शन 😍

◆ गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत.
◆ पुढे गडाचा दिंडी दरवाजा आहे. यात देवड्या सुद्धा आहेत.
◆ गडाला तिहेरी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते.
◆ गडावर दोन पाण्याचे हौद आहेत.

◆ गडावर एक शंकराचे मंदिरही आहे.
◆ गडावर एक भुयारी मार्गही आहे पण तो अस्तित्वात नाही.
◆ गडावर काही धान्यकोठारे, शस्त्रागार, निवासस्थाने, आखाडा व कैदखाना सुद्धा आहे.
◆ गडावरून दिसणारे इतर किल्ले – सुधागड, घनगड, तैल बैला आणि कोरीगड.

विशेष 🤩

★ सरसगड (sarasgad) उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावानी ओळखला जातो.

जवळचे किल्ले 🤩

  1. सुधागड
  2. कोरीगड
  3. मानगड
  4. मोरगिरी
  5. मृगगड
  6. कुर्डूगड

कसे जाल ? 🕺🏼

पाली गावात उतरून गडावर जात येते. गडावर जाण्यासाठी दोन वाट आहेत. गणपती मंदिराकडून जाणारी वाट प्रामुख्याने वापरली जाते.

  • राहाण्याची सोय : गडावर तसे पाहिले तर राहण्याची व्यवस्थित सोय नाही मात्र ७ ते ८ जणांना दिंडी दरवाज्यासमोर असणार्‍या देवडयां मध्ये अथवा धान्यकोठारे, कैदखाना येथे रहाता येते पण गडावर फार कमी ट्रेकर्स रहातात.
  • जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत: करवी.
  • पाण्याची सोय : गडावर पाण्याची भरपूर टाकी आहेत, पण बालेकिल्ल्याच्या जवळ असलेल्या शहापीराच्या उजव्या बाजूस असणारा हौद पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने योग्य आहे.

1 Comment

Leave a Comment

Your email address will not be published.


Start typing and press Enter to search